
जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५
जळगाव शहरात गणेशोत्सवाची जल्लोषात सुरुवात होणार असून, यंदा ‘सदगुरु नगरचा राजा’ या प्रसिद्ध गणेश मंडळाचा आगमन सोहळा दणक्यात पार पडणार आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२५, सोमवारी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा अयोध्या नगर, तृप्ती कॉर्नर, एम.आय.डी.सी परिसरातील सद्गुरू नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भव्य आगमन सोहळा म्हणून ‘सदगुरु नगर मित्र मंडळा’चा सोहळा ओळखला जातो. यंदा या सोहळ्याची खासियत म्हणजे आकर्षक देखावा, दमदार ढोल-ताशा पथक, श्री देव मामलेदार ब्रास बँड, महाकाल लाईट्स, को2 मशीन, फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, या भव्य स्वागत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




















