• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी पारित कायद्यामुळे कायदेशीर आधार मिळाला

महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी पारित कायद्यामुळे कायदेशीर आधार मिळाला
Share on FacebookShare on Twitter

जामनेर : प्रतिनिधी

श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण तसेच अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा थांबवण्यासाठी जादूटोणाविरोधी कायद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच वाळीत टाकलेल्या, बहिष्कार घातलेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी व जात पंचायत भरवून अन्याय करणाऱ्या पंचांना धडा शिकवण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे मोठा आधार मिळाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी केले.

जामनेर पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबतची प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यशाळा गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक किरण शिंदे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जामनेर शहराध्यक्ष मनोज महाले, शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून कार्यशाळेचा उद्देश प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केला. यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मंत्राने नारळ पेटवणे, नारळातून करणी काढणे आदि चमत्कार दाखवून त्याच्यामागील विज्ञान स्पष्ट केले.

कार्यशाळेत ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आणि ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ याविषयी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की,अंनिसने १८ वर्षांच्या दीर्घ संघर्षातून तसेच डॉ. दाभोलकर यांच्या बलिदाननंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित करण्यात समितीला यश मिळाले. या कायद्यामुळे नरबळी देणं, दैवी शक्ती व गुप्तधनाच्या नावाखाली कोणी फसवणूक करत असेल, लैंगिक शोषण करीत असेल, साप चावल्यावर डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे नेत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो.

त्यासाठी आता कायदा मजबूत झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. श्रद्धेच्या नावाखाली चालणारे व देवाधर्माचा वापर करून मानसिक, आर्थिक, शारीरिक शोषण करणाऱ्या बाबा-बुवा, अम्मा-माता अशांवर आता थेट कायदेशीर कारवाई करता येते, असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर अनेक जात व्यवस्थांनी त्यांच्या पंचायती बसवून समाजातील नागरिकांचे शोषण करणे, त्यांना वाळीत टाकणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न करून घेणे, दैनंदिन व्यवहारावर बंदी घालणे अशा गोष्टी केल्या तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. समितीने हे दोन कायदे राज्य सरकारकडून पारित केल्याने महाराष्ट्रातील शोषित होत असलेल्या जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नागरिक आता थेट पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकतात. दोषींवर गुन्हे दाखल करू होतात. नागरिकांना कायद्याचं संरक्षण मिळाले, अशी माहितीही यावेळी विश्वजीत चौधरी यांनी दिली.

आभार शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे यांनी मानले. पोलीस नाईक सुनील माळी, हवालदार रमेश कुमावत, कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, तुषार पाटील यांच्यासह अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, कायदेशीर सल्लागार अँड. राजू मोगरे, महिला विभाग सचिव शोभा बोऱ्हाडे, ऋषिकेश शिंदे यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील ४३ गावांचे पोलीस पाटील, पोलीस स्टेशन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group