जळगाव मिरर । २१ नोव्हेबर २०२२
सध्या देशभर गाजत असलेले दिल्लीतील श्रद्धा हत्या प्रकरण ताजे असतांना याचदरम्यान राज्यातील औरंगाबाद शहरात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकर समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महाविद्यालयात आज दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, मुलगा साधारण 70 तर मुलगी 30 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून या तरुणाने स्वतःला पेटवून का घेतलं याचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी ही आगीवर नियंत्रण मिळवले. हे एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला की दोघे एकमेकांना ओळखत होते याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. या प्रकरामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली होती.
