
जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२
भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी दि ३ रोजी संध्या ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर असतांना अनोळखी इसमाने काही तरी फूस देत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या अल्यापवयीन मुलीचे परिवार या गावात मजुरी करीत उदरनिर्वाह करीत आहेत. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.अमोल पवार हे करीत आहेत.




















