
जळगाव मिरर | १० एप्रिल २०२५
पायी जात असलेल्या सुभाष पुना सपकाळे (वय ५३, रा. गेंदालाल मिल) यांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात प्रौढ हे गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ८ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरात सुभाष पुना सपकाळे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. लाकूडपेठ येथील स्वामील कंपनीत हमाली काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ते रस्त्याने पायी जात असताना त्यांना भरदा दुचाकीने जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, दोन मुलं, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.




















