
जळगाव मिरर | २१ मार्च २०२५
जळगाव शहरातील महाबळ परिसरातील रामलक्ष्मण नगर, गाडगेबाबा चौक येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रामलक्ष्मण नगर परिसरातील समस्त रहिवासींच्या वतीने २० मार्च ते २६ मार्च पर्यंत दररोज संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान संगितमय श्रीमद शिव भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.
श्रीमद भागवत कथेचे निरुपण राष्ट्रीय किर्तनकार, ह.भ.प गजानन महाराज धानोरेकर करीत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून रामलक्ष्मण नगरात सामाजिक कामांसह धार्मिक कार्यक्रमांची मालिकाच परिसरातील नागरिकांच्या वतीने सुरु आहे. रोज सकाळी काकडा आरती, दोन्ही वेळेस हरिपाठ व संध्याकाळी श्रीमद भागवत कथा सुरु आहे. काल्याचे किर्तन गुरुवार दि.२७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. त्याच दिवशी १० नंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उपस्थितीचे आवाहन समस्त रामलक्ष्मण नगर परिसर रहिवासींच्या वतीने करण्यात आले आहे.