
जळगाव मिरर | २३ जून २०२४
देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ येथे त्यांच्या पुतळ्यास मंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ,माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तर्फे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
एक राष्ट्र,एक निशान,एक विधान यासाठी मरे पर्यंत आग्रही असलेले, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी भारतीय जनता पार्टीतर्फे दरवर्षी २३ जून रोजी बलिदान दिवस म्हणून मनविण्यात येतो. भुसावळ शहरातील मध्यवर्ती डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सदरील कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके,माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र वाणी, बापू महाजन, अजय नागराणी, पवन बुंदेले, विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, शेखर धांडे,प्रवीण इखणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, महिला मोर्चाच्या शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, पल्लवी वारके, वैशाली सैतवाल, ग्रामीण मंडळचे चुडामन भोळे, प्रमोद भोळे, केशव धांडे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, बीसन गोहर, कैलास शेलोडे, प्रशांत पाटील, विशाल जंगले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे,धनराज बाविस्कर, राजू खरारे, अनिल पाटील, अल्बर्ट तायडे,शिशिर जावळे, गोपी राजपुत, सागर चौधरी, राजेंद्र यादव, योगेंद्र हरणे, आदर्श पंड्या, अथर्व पांडे, अमित असोदेकर, नंदकिशोर बडगुजर, रेहमान शेख आदींची उपस्थिती होती.