• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !

कोरोना काळात वडीलांचे निधन झाल्यावरही मुलांनी चालविली कोर्टात केस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2023
in क्राईम, राज्य
0
पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ मार्च २०२३

देशात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात. त्याचा कधी कोणत्या पाळीव प्राण्याशी संबंध येत नसतो पण या घटनेत जरा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका महिलेची ती घरी एकटी असताना चोरीच्या उद्देश्याने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेच्या पाळीव कुत्र्याला देखील संपविण्यात आले होते. मालक मुलासोबत एका लग्नात गेले होते, घरी परतले तर त्यांची पत्नी आणि कुत्रा निपचित पडले होते. या प्रकरणात आता नऊ वर्षांनी दिल्ली सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. पण खटला कसा उभा राहीला हे मोठे मनोरंजक आहे.

आग्राच्या रहिवासी विजय शर्मा २० फेब्रुवारी २०१४ रोजी आपल्या मुला सोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. ते रात्री उशीरा घरी परतले तर त्यांची पत्नी नीलम हीचा देह निपचित पडला होता. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचा पाळीव कूत्रा देखील शेजारीच मृतावस्थेत पडला होता. त्यानंतर त्यांनी पोलीसांनी कळविले. पोलीसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.

पोस्टमोर्टेममध्ये महिलेच्या शरीरावर 14 वार झाले होते. तर कुत्र्यावर 9 वार करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होती परंतू कोणताही धागा सापडत नव्हता. पोलीसांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करताना पिंजऱ्यातील पोपट काही तरी बोलत होता. त्याच्या त्या कर्कश्य आवाजात माग पोलीसांनी घेतला. आणि पोलीसांना संशय आला की हा नेमके काय बोलत आहे. ज्यावेळी त्यांनी नीट ऐकले तेव्हा तो.. ‘आशु आया था’..’आशु आया था’, असे पोलीसांना सांगत होता. ज्यावेळी या आशु कोण आहे याचा धाडोंळा घेतला सर्व प्रकरणाचा उलगडा होत गेला. पोलिसांनी आशु याचा शोध घेतला असता त्याने सुरूवातीला काही ताकास सूर लावू दिला नाही, परंतू पोलीसांनी जेव्हा चौदावे रत्न दाखविले तेव्हा तो सूता सारखा सरळ झाला. आणि बोलू लागला. आशुतोष हा मालकीण नीलम याचा भाचाच असल्याचे उघडकीस आले. आशुतोष आणि रॉनी यांनी मिळून नीलम यांना दागिन्यांसाठी संपविल्याचे उघडकीस आले.

मालक विजय शर्मा यांनी पोलीसांना पोपट नेमके काय बोलत आहे ते सांगितले. पोलिसांनी देखील या पोपटाशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विजय शर्मा यांनी देखील पोपटाची भाषा नीट विशद करून पोलीसांना सांगितली. त्यानंतर आशुतोष आणि रॉनीला पकडण्यात आले. त्यानंतर या दोघांवर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलीसांनी आरोपपत्रात पोपटाच्या बडबडीचा साक्ष म्हणून समावेश केला. परंतू कोर्टाने ही साक्ष ग्राह्य मानली नाही. कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर नऊ वर्षे ही केस चालली, त्यानंतर गुरूवारी या केसचे निकालपत्र वाचण्यात आले.

कुत्रा आपल्या मालकावर कोणी हल्ला करीत असेल तर सहसा शांत बसत नाही , तो प्राणपणाने प्रतिकार करणारच. या घटनेत आशुतोष गोस्वामी याला कुत्र्याला चावल्याच्या गंभीर जखमा झाला होत्या. त्यामुळे कोर्टाने ही बाब लक्षात घेतली, नीलम यांचा पाळीव कुत्रा स्वामीभक्त होता. त्याने आरोपींना जोरदार प्रतिकार केला होता. कुत्र्यावर वार करून त्याला ठार करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी भाचा आशुतोष गोस्वामी याच्या अंगावर कुत्रा चावल्याच्या गंभीर जखमा झाल्या होत्या. अजय शर्मा यांचा कोरोनाकाळात मृत्यू झाला. तरी त्यांच्या मुलींनी खंबीरपणे आईचा खटला कोर्टाच्या तारखांना हजर राहून शेवटपर्यंत चालविला. खटल्यात सरकारी पक्षाने 14 साक्षीदार सादर केले. तर बचावपक्षाने केवळ एकच साक्षीदार हजर केला. कोर्टाने उपलब्ध पुराव्यानूसार भाचा आशुतोष आणि रॉनी यांना जन्मठेप सुनावली. सरकारी पक्षाचे महेंद्र दीक्षित यांना सांगितले की विशेष सत्र न्यायाधीशांना आरोपी आशुतोष गोस्वामी आणि रॉनी मॅसी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Related Posts

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
क्राईम

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 8, 2026
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !
क्राईम

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !
क्राईम

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !
क्राईम

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 8, 2026
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group