जळगाव मिरर | राजकीय विश्लेषण
राज्यातील रायगड जिल्ह्यावर एक संकट कोसळला अन सह्याद्रीचा दरड कोसळून एक गावच मातीमध्ये गायब झाले. या घटनेमुळे राज्य हळहळळे. कारण पुणे जिल्ह्यातील इर्शारवाडी डोंगराच्या हृदयात गायब झाले होत. रात्रीच्या सुमारास थोडीशी झोप लागावी अन इतकं मोठं संकट यावं हे त्यापेक्षा दुर्दैवी जे गावाबाहेर गेले ते वाचले आणि गावातल्या अनेकांना मृत्यूशी संघर्ष करावा लागला. या सर्व घटनेत एक गोष्ट आशादायक दिसली ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत. दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो रोल निभावला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री राज्यात मोठ संकट असताना घरात बसून सोशल मीडियावर सरकार चालवीत असताना पण हे मुख्यमंत्री घर सोडून पावसात भला मोठा डोंगर चढत चिखल तुडवत, हा माणूस त्या घटनास्थळी पहाटेच्या सुमारास पोहोचला. म्हणूनच राज्यातील जनता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करत आहेत. म्हणूननच सह्याद्रीत भिजलेला एक ‘नाथ’ असेच म्हणावे लागेल.
राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते पावसात भिजले त्यांचे राज्याने मोठ कौतुक देखील केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एक नव्हे तर दोन-दोन वेळा पावसात भिजले, पहिल्यांदा ते साताऱ्याच्या लोकसभेच्या प्रचारावेळी सभा सुरु असतांना पावसात भिजले ते आपल्या पक्षाला मत मागायला, जनतेने त्यांच्या झोळीत एक खासदार टाकावा म्हणून भिजले. तर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पक्षातील आमदारांसह भाजप व शिंदे यांच्यासोबत जावून सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात जात असतांना पावसात भिजले ते म्हणजे अजित पवार व त्यांच्यासोबत निघून गेलेलं छगन भुजबळ यांना धडा शिकविण्यासाठी पावसात भिजले, पुन्हा राष्ट्रवादीच्या मागे जनता उभी रहावी म्हणून पावसात भिजले. यातून केवळ पावसात भिजण्याचे दोन कारण समोर येतात ते म्हणजे कुणाची तरी वाट लावण्यासाठी किवा पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळावे यासाठी शरद पवार पावसात भिजले, पण मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसात भिजले ते कुणाची वाट लावायला नाही आपल्या पक्षासाठी मत मागायला नाही तर इर्शारवाडीत झालेल्या दुर्घटनेतील संकटग्रस्त लोकांना पुन्हा उभ करायला त्यांना मदत द्यायला, गेल्या दोन वर्षापूर्वी जगभरात कोरोनाचे थैमान असतांना राज्यात देखील या संकटाचा सामना अनेकानी केला. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री केवळ फेसबुक लाइवच्या माध्यमातून जनतेच्या पाठीवरून हात फिरवत होते.
कसे पोहचले मुख्यमंत्री घटनास्थळी ?
रायगड जिल्ह्यातील इर्शारवाडी रात्री १०.३० वाजता घटना घडली ती घटना ११.३० वाजता प्रशासनाला मिळाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेथील जिल्हाधिकारीशी संपर्कात राहिले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतांना सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी डोंगर चढून चिखल तुडवीत आणि पावसात भिजत घटनास्थळी पोहचून तेथील नागरिकांच्या मदतीला धावून आले. नुसते पाहणी करण्यासाठी नव्हे तर त्याठिकाणी त्यांच्यासोबत वैद्यकीय सहाय्यता कक्षातील मदतनीस यांना घेवून ज्या नागरिकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. ‘त्या’ गावातील शाळेत प्रत्येक दुखापत झालेल्या नागरीकांची ते तपासणी करू लागले. मुख्यमंत्री शिंदेंच्या आधी गिरीश महाजन हे घटनास्थळी पोहचले होते. यावेळी राज्यातील मंत्री अनिल पाटील, उदय सामंत, आदिती तटकरे हे सुद्धा घटनास्थळी पोहचून मदत कार्य करीत होते. आजवर राज्याने अनेक मुख्यमंत्री पहिले घरातून सरकार चालविणारे पाहिले पण लोकांच्या घरात जावून मदत करणारा एकनाथ आता सापडला याच कौतुक मोठ आहे. घटना दुर्देवी आहे पण एक मुख्यमंत्री थेट लोकांच्या घरात जावून मदत करतो याच कौतुक नक्कीच केल पाहिजे. राज्यात आजवर अनेक नैसर्गिक आपत्ती आली व राज्याने ती सहन देखील केली. पण राज्यातील नागरिकांना संकटकाळात बाहेर काढण्यासाठी तळ ठोकून असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिसले. म्हणून भिजणारे अनेक नेते पाहिले पण जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी भिजणारा एक’नाथ’ राज्यातील जनतेला या दुर्देवी घटनेनंतर दिसले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात.