जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. आदरणीय दादांच्या जाण्याने सामाजिक,शैक्षणिक,सहकार, राजकीय क्षेत्राची कधिही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी,तक्रारी(समस्या) घेऊन दादांच्या दरबारी जात होते. व दादा जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा करीत असे. त्यांच्या या आपल्यातून अकाली निघून जाण्याने राज्यातील जनता पोरकी झाली असल्याची भावना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन अध्यक्ष- निलेश बोरा यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केली. तसेच दादांची दैनदिन कामाची वेळ ही पहाटे ५ वाजेपासून सुरू व्हायची व दिवसाचे १६-१७ तास काम करून नागरीकांच्या प्रश्नांचा निपटारा जागेवरच करीत असे अशी दादांची राज्यभरात नाव लौकिक होते. व दादांची प्रशासनावर असलेली पकड ही वाखाणण्या जोगी होती. आजच्या राजकीय परिस्थितीत दादांसारखा शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणून दादांची ओळख राज्याला होती. दादांचे कार्य हे सामान्य जनतेच्या मनात कायम कोरलेले राहील.
तसेच शेखर देशमुख यावेळी आपल्या भावना व्यक्त करत दादा आज आपल्यातून निघुन गेले यावर विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त केली आहे. यावेळी- उपस्थितांचे मन गहिवरून आले. सदर श्रद्धांजली कार्यक्रम दि.२८/०१/२०२६ रोजी रात्री-९:०० वाजता चौघुले प्लॉट हनुमान मंदिर चौक,जळगांव येथे जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला. सर्वप्रथम- स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- हिरालालबापू वाणी, डॉ.राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-कैलास तिवारी,मधुकर चौधरी,राजेश सपकाळे,विजय सोनवणे,राजू मिस्तरी,सचिन ठाकूर,पप्पू पाटील,दिलीप सावळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या-श्रीमती शारदाताई बोरा,योगिताताई चौधरी,रेखाताई गवळी,उमेश भालेराव,बापू कोळी,शेखर देशमुख,महेश भालेराव,सागर सोनार,मानव चौधरी,नथ्थू बोरसे,संदिप पाटील,नाना महाजन,राजेश गवळी,सचिन चौधरी,सतिष चौधरी,कवि-प्रकाश पाटील,प्रल्हाद चौधरी,मुरलीधर सपकाळे,संजय वाणी,लक्ष्मण पाटील,रविंद्र.पी.चौधरी,महेश गायकवाड,नरेंद चौधरी, घनश्याम गवळी,विठ्ठल सावळे,कृष्णा गवळी,राजू कुमावत,रविंद्र मराठे,अमोल चौधरी आदींनी स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















