• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग

नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 25, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, मनोरंजन
0
नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २५ नोव्हेंबर २०२२

‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने बुधवार, ३० नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा. कांताई सभागृह (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सादरीकरण होईल.
स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्याी या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अनोखे रंगमंचीय सादरीकरण
सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group