
जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
जगातील अनेक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली असून देशात नवीन तेल साठा सापडल्यामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु, आज वाढलेल्या किमतींमुळे पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे.
काल WTI क्रूड प्रति बॅरल $ 70.94 वर विकले जात होते. तर ब्रेंट क्रूड $ 2.64 च्या घसरणीसह प्रति बॅरल $ 76.12 वर व्यापार करत होते. निवडणूकीपूर्वी इंधनाच्या किंमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.काल गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 56 पैशांनी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 52 पैशांनी महागले आहे. जाणून घेऊया पुण्यातील आजचा भाव.
पुणे – पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर
ठाणे – पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल 106.62 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर – पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर