जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।
भुसावळ शहरातील साई निर्मल फाउंडेशन संचलित श्री नमो विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. स्पर्धेत एकूण 135 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. सदर निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले होते.
1) मी निष्ठावंत कार्यकर्ता बोलतोय. 2) मी अनुभवलेला भारतीय जनता पक्ष 3) भारतीय जनता पार्टी पक्ष आचारसंहिता व त्याची प्रभावी अंमलबजावणी. 4) पक्षांतर एक कीड 5) विकसित भारताच्या निर्मितीत भाजपाच योगदान. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनामूल्य होती. या स्पर्धांमधील सर्व विजयी स्पर्धकांचे वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ तसेच निबंध हे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री .जे.पी नड्डा भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यालय दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. दोघेही स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
वक्तृत्व स्पर्धा – कु. सायली गणेश महाजन. खडके ता. भुसावळ जिल्हा जळगांव (प्रथम क्रमांक) कुमार विष्णू महाजन पाचोरा (व्दितीय क्रमांक) सौ. शोभाबाई अंबादास वारके (तृतीय क्रमांक) मस्कावद ता रावेर
निबंध स्पर्धा – श्री. दिवाकर नाना बडगुजर शेंदुर्णी ता जामनेर (प्रथम क्रमांक. डॉ. प्रतीक्षा राजेंद्र सोनवणे चोपडा (द्वितीय क्रमांक) अबोली रवींद्र पाटिल जळगांव.( तृतीय क्रमांक)
स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे व प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये कळविलेले आहे.