जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२४
यावल तालुक्यातील विरावली ते यावल रस्त्यावर महसूलच्या गस्ती पथकाने अवैध वाळू वाहतूक करतांना वाहन पकडले आहे. या प्रकरणी वाहन मालकास दंडाची नोटीस बजावली आहे. सातत्याने महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईमुळे अवैध वाळू वाळू व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरावली ते यावल रस्त्यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनात महसुलचे गस्ती पथक वाहन तपासणी करत होते. या पथकाला विरावली कडे अवधू वाळू नेतांना टाटा कंपनीचे वाहन (एमएच- १९, सीएक्स ११३५) दिसले. पथकातील तलाठी ईश्वर कोळी, वसीम तडवी, मिलींद कुरकुरे यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नव्हता. त्यामुळे हे वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. तर कोळन्हावी येथील वाहन मालक चैत्राम कोळी यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.