
जळगाव मिरर | २४ मे २०२३
जळगाव शहरातील जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न असलेल्या रस्त्याच्या कामांना शहरातील अनेक प्रभागात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जळगावकर नागरिकांचा त्रास आता कमी होण्याकडे दिसत आहे. शहरातील प्रभाग क्र.१ मधील अनेक रस्त्यांचा प्रश्न सुद्धा यंदा नगरसेवक दिलीप पोकळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्र.१ मधील नागरिकांना अनेक समस्याचा सामान करावा लागत होता. त्यातील प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे. अनेक नागरिकाच्या या रस्त्यावर अपघात देखील झाले आहे. तर प्रभात उड्डाणपुलाचे काम देखील जलद गतीने सुरु आहे. त्यासोबत प्रभागातील भारत नगर, राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर, जनाई नगर, सिद्धीविनायक पार्क, हरीओम नगर परिसरात रस्त्याच्या कामे पुर्णत्वाकडे आली आहे. तर काही ठिकाणी गटारी देखील पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी गटारीचे काम बाकी आहे. प्रभागातील नगरसेवक दिलीप पोकळे यांच्याकडे अनेक नागरिकांनी रस्ता, गटारी बाबत अनेक तक्रारी गेल्या दोन वर्षपासून होत होत्या. त्यावर जळगाव मनपा येणाऱ्या निधीतून नगरसेवक पोकळे यांनी प्रभागासाठी निधी आणून प्रभागातील रस्त्याचा प्रश्न जरी सोडला असला तरी गटारीचा प्रश्न प्रलंबित आहे. यावर नगरसेवक पोकळे यांनी अजून जरा मेहनत करून निधी आणला तर प्रभातील गटारी सुद्धा होतील. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहें.





















