जळगाव मिरर / १७ फेब्रुवारी २०२३ ।
गेल्या वर्षी देशभर गाजलेला चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’ त्याच चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने २०२१ च्या अखेरीस थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘ पुष्पा- द राइज’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन आता बराच काळ लोटला आहे, पण तरीही लोकांची या चित्रपटाची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
अल्लू अर्जुनच्या डायलॉग डिलिव्हरीपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच लोकांच्या ओठावर आहेत. आज लोकांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी ‘पुष्पा २’ संदर्भात दोन अपडेट्स समोर आले आहेत. त्यापैकी एक ऐकून लोक निराश होतील, तर दुसरी ऐकून त्यांना खूप आनंद होईल.
पुष्पा २ची पहिली बातमी सर्वांची आवडती अभिनेत्री आणि ‘ओ अंटावा’ गर्ल समंथा रुथ प्रभू बद्दल आहे. ‘पुष्पा द राइज’मध्ये आपल्या डान्स मूव्ह्सने मन जिंकणाऱ्या समंथाने ‘पुष्पा २’ची ऑफर नाकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा द रुलमध्ये सामंथाला आयटम सॉंगची ऑफरही आली होती पण अभिनेत्रीने हे गाणे करण्यास नकार दिला आहे.’ मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. समांथाची ऑफर नाकारण्यामागचे कारणही बातमीत सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, पुष्पा २ मध्ये समांथा तीन मिनिटांचे गाणे करणार होती. या गाण्यासाठी निर्मात्यांनी समंथाला पाच कोटी रुपये देण्यास सांगितले होते, पण समंथाने ते नाकारले. समंथा म्हणाली की, करिअरच्या या टप्प्यावर तिला आयटम साँग करायचे नाही. तथापि, चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि संपूर्ण टीम समांथाला काम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या ४१व्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’ची टीम अभिनेत्याच्या चाहत्यांना चकित करण्याची तयारी करत आहे. असे म्हटले जात आहे की सुकुमार ‘पुष्पा २’ ची एक झलक किंवा छोटा टीझर व्हिडिओ अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच ८ एप्रिल रोजी रिलीज केला जाईल.
