
जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२२
राज्यात विविध जिल्ह्यात राज्यपाल कोश्यारी व भाजप मंत्री पाटील यांच्या बेताल वक्तव्यामुळे सर्वच विरोधक आंदोलन करीत असतान जळगाव शहरातही याचे पडसाद उमटले असल्याचे जळगाव शहरवासियांनी आज सकाळी अनुभवले.
राज्यात वारवार बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने जळगाव-धुळे महामार्ग शिव कॉलनीजवळील मुख्य रस्ता रोखत आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणाबाजी केली तर राज्यपाल कोश्यारी यांना हाटावच्या हि घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्यासह विभागप्रमुख विजय बादल, अंकुश कोळी, उमेश चौधरी, भीमराव पांडव, मजीन सय्यद यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी रस्ता रोकून धरला होता. यावेळी पोलिसांचा फौजफाटा हि मोठ्या प्रमाणात होता.




















