
जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२२
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राज्यपालांविरोधात संतप्त भावना आहे. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता याचा मुहूर्तही ठरला आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक सध्या तोंडावर आली आहे. त्यामुळे केंद्रातलं भाजपा नेतृत्व सध्या तिकडे व्यस्त आहे. त्यामुळे कोश्यारींना काही वेळ मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राज्यपालांविरोधात संतप्त भावना आहे. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.





















