
जळगाव मिरर | १३ मे २०२५
भरधाव ट्रॅक्टर उड्डाण पुलावरून खाली उतरत असताना अचानक ट्रॅक्टर व ट्रॉलीला जोडणारा हुक निघाल्याने ट्रॅक्टर काही अंतर पुलावरून खाली उतरत गेले मात्र यावेळी ट्रॅक्टरच्या पुढे कुठल्याही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात नवीन बनविलेल्या दिनांक 12 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिमेंटची वाहतूक करणारे एक भरधाव ट्रॅक्टर क्र. एम.एच.१९.बीजी.३२५२ हे नवीन कानळदा रोड परिसरातून रिंग रोड परिसरात येत असताना अचानक या ट्रॅक्टरचे हुक निघाल्याने हे भरधाव ट्रॅक्टर काही अंतर पुलावरून उतरत खाली आले. यावेळी हा हुक रस्त्यावर आदळल्याने रस्त्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पत्र यावेळी ट्रॅक्टरच्या पुढील रस्त्यावर कुठलेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही घटना घडली तेव्हा परिसरातील नागरिक या ठिकाणी असल्याने रस्त्याचा नुकसान झाल्याचे पाहून संताप व्यक्त करत होते.




















