जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही वर्षापासून राज्यासह अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घडत असताना परिवारातील पती-पत्नीमध्ये देखील हमरीतुमरी होवून मोठ्या वादात रुपांतर होत असते आता पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव आहे. तो सामजिक कार्यकर्ता होता, तर आरोपी पत्नी ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नुकल भोईर हाँ त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर खूप संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा. काल दिवाळीच्या दिवशी देखील याच संशयावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटतो ना मिटोत तोच पुन्हा त्याच कारणावरून रात्रीही ते एकमेकांशी पुन्हा भांडेल. आणि त्याच वादात पत्नीने तिचीच ओढणी वापरत पती नुकलाचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली.
गुन्ह्याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी पत्नीला बेड्या ठोकून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.




















