जळगाव मिरर | १ मार्च २०२५
दोन महिन्यांपूर्वी नवीन घरात राहण्यासाठी आलेल्या एका ३२ वर्ष राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता बिबानगर येथे घडली आहे. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. समाधान रमेश शिरसाठ (वय-३२), रा. डांगरी ता. अमळनेर ह.मु. बिबा नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील बिबा नगर परिसरात समाधान शिरसाठ हा तरूण पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. समाधान शिरसाट याने घरात सर्वजण झोपलेले असताना राहत्या घरात गळफास घेतली. ही घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने उघडकीला आले आहे. दरम्यान शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने खाली उतरून त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.




















