
जळगाव मिरर / २३ ऑक्टोबर २०२२
जायन्ट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव आणि महिला सखी पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हरिविठ्ठल नगर भिल्ल वस्ती येथे ५० गरीब कुटुंबीयांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.
दिवाळी तोंडावर आलेली असताना घरात अन्नाचा कण नाही अशा गरीब कुटुंबीयांना दिवाळी फराळ , कपडे, मिठाईचे वाटप सर्व महिला पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक सौ मनिषा पाटील व अध्यक्ष ज्योती राणे, नेहा जगताप, संगीता चौधरी, किमया पाटील, रेणुका हिंगु, शशी शर्मा, सुचिता पाटील ह्या उपस्थीत होत्या, या उपक्रमासाठी सर्व पदाधिकारी यांचे आर्थिक सहकार्य लाभले.





















