अमळनेर : विक्की उत्तम जाधव
दिव्यांग मुला मुलींना आपल्या शाळेत स्वताच्या मुलांप्रमाणे काळजी घेऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करीत आहात यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दिव्यांग मुलांची सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे आणि ती सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन व सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू करीत आहेत हे निश्चितच अभिनंदन आहे असे नवी दिल्ली चे निसाग्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ आकाशजी शाहा यांनी कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री मनोहर भगवान महाजन सर (अध्यक्ष क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर होते, प्रमुख अतिथी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन (चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा),ॲड.रमाकांत सुदाम महाजन (तज्ञ संचालक अर्बन बँक अमळनेर), श्री संजय संतोष महाजन (बांधकाम कॉन्ट्रॅक्टर वेंकटेश कंट्रक्शन पारोळा), श्री अनिल गंगाराम महाजन ( मा.उपनगराध्यक्ष नगरपरिषद अमळनेर), श्री महेंद्र सुदाम महाजन (चेअरमन-साने गुरुजी वि.का.सो अमळनेर,), श्री राजू भास्कर महाजन सर (पंच क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर), श्री साखरलाल शांताराम महाजन ( नगरसेवक न.प.अमळनेर), श्री प्रवीण युवराज महाजन (लोकसेवा मेडिकल अमळनेर), श्री सीएम शिंदे (नि.जी आर पी एफ, अमळनेर), श्री ईश्वर आर महाजन सर (मुख्य संपादक मराठी लाईव्ह न्युज अमळनेर), श्री सुधीर चौधरी (समाजसेवक अमळनेर), श्री भगवान महाजन (नि. बीएसएफ पारोळा), श्री गणेश तापीराम महाजन (जयेश स्टेशनरी पारोळा), सौ वसुंधरा लांडगे मॅडम(संचालिका-अर्बन बँक अमळनेर,) होते.
निसाग्रा रिन्युवेबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिल्ली यांचे कडून चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे 4,60,000 (अक्षरी- चार लाख साठ हजार रुपये ) रु.किमतीचे खालील वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात.
1) LCD TV 32 inch ( 8 No.),2) LCD projector -01
3) screen -1,4) speaker – 4,5) Dell computer -02
6) brother color printer-01,7) water proof mattress – 50,8) samsung freez – 255 liter
9) ata chakki -01,10) Roti maker machine -01
या वस्तूंचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा माननीय श्री. आकाशजी शाह निसाग्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिल्ली यांचे हस्ते करण्यात आला. या उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आकाशजी शाह यांनी संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या वेळी विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य, गीत गायन सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकून लक्ष वेधून घेतले. तसेच व्यावसायिक गटातील विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंचे जसे फाईल, तिळगुळ पॅकिंग, शेव पॅकिंग, ग्रीटिंग, प्रदर्शन भरवण्यात आलेले होते. उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर व सर्व विद्यार्थी व त्यांना घडवणारे विशेष शिक्षक यांना कौतुकाची थाप व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात क्षत्रिय काचमाळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन म्हणाले की परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा येथील मतिमंद मुला मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष नेहमीच कार्यतत्पर असतात व शाळेतील सर्व कर्मचारी मतिमंद मुला मुलींची सेवा करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हीच सेवा तुम्हाला सर्वांगीण जीवनात उपयोगात पडेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.