
जळगाव मिरर / १ नोव्हेंबर २०२२
एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील २६ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात खबर देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की , ताडे येथील रहिवासी नितीन संजय धनगर याने (वय २६ वर्षं) कपाशी वेचण्याचे शेतात काम सुरू होते म्हणून सकाळी ८ वाजता आई व लहान भावाला मोटरसायकलने शेतात सोडले व घरी आला. घरात एकटा असल्याने घराच्या छताच्या कडीला दोरी अडकून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दिनांक १ रोजी घडली. या बाबत कासोदा पोलिस स्टेशनमध्ये खबर देण्यांत आली आहे. नितीनच्या आत्महत्याने गावावर शोककळा पसरली आहे. नितीन धनगर हा घरातील कर्ता तरुण होता. एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नितीन धनगर यांच्या पश्चात आई , भाऊ , असा परिवार आहे.




















