जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास रिक्षाचालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोजगाराचा ताण आणि कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील नागोरी डेअरीच्या गल्लीत बिलाल शेख वलियोद्दीन हा तरुण चार वर्षाची मुलगी आणि पत्नीसह रहिवासास असून कोरोना काळा नंतर कर्जबाजारी झाल्या पासुन हा तरुण प्रचंड तणावात होता. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच पत्नीने हंबरडा फोडित आक्रोश केला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या घरी धाव घेत तरुणाचा मृतदेह खाली उतरवुन जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शहर पोलिसांत या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरु होते.