
जळगाव : प्रतिनिधी
समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव ही नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम युवक-युवतींसाठी राबवत असते नुकतेच संस्थेने दोन दिवसीय दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी छायाचित्रण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. संस्थेच्या उद्देशा प्रमाणे शैक्षणिक उपक्रम म्हणून व आजच्या युवक-युवती मध्ये कॅमेरा ट्रायपॉड, गिंबल, स्पोटलाईट ,फ्लॅश, मेमरी कार्ड बॅटरी व सर्वात महत्त्वाचे लेंसेस याबद्दलचे बेसिक ज्ञान त्यांना मिळावे व कौशल्याच्या जोरावर त्यांनी आर्थिक प्रगती करावी व स्वयंरोजगार निर्माण व्हावा म्हणून संस्थेने हा उपक्रम राबविला.
या कार्यशाळेला शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरील ही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली स्वतः कॅमेरा हातात घेऊन काही सुंदर फोटो सुद्धा काढले कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी मॉडेल फोटोग्राफी, वाईल्डलाईफ फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी चाईल्ड फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी स्वतः अनुभवल्याने त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यशाळेचे उद्घाटन हे संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी नटराजाच्या मूर्तीला माल्यार्पण करून व कॅमेर्याची पूजा करून कार्यशाळेला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सदस्य विशाल जाधव यांनी केले कार्यशाळेचे संपूर्ण मार्गदर्शन रविकुमार परदेशी सर यांनी केले कार्यशाळेचे समारोप व आभार प्रदर्शन रोहिणी निकम यांनी केले
कार्यशाळेत देवांशू मराठे, यश वाघ ,समिक्षा छाडेकर, केतकी महाजन, शुभम सपकाळे, कृष्णा बारी ,पायस साळवे, प्रणिता शिंपी ,खुशबु सुतार, पल्लवी देशपांडे ,खुशी गुप्ता, वेदिका मुळे ,मनोज बिरहारी, तेजस कोठावदे ,मयुर भंगाळे, यश अहिरराव, भूषण भोई ,रोहित भोई ,भावेश पाटील ,योगेश लांबोळे ,श्वेतांबरी पाटील ,तृप्ती बाक्रे ,महेश कोळी, देवाग शिंपी, पूर्वा जाधव, समर्थ जाधव,इत्यादी सहभागी झाले




















