जळगाव मिरर | १८ जून २०२३
भुसावळ तालुक्यातील एका ठिकाणी जुन्या वादातून दोन तरुणात झालेल्या मारहाण झाली यावेळी एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत मंगल शांताराम शेळके हा तरून मृत्यू झाला असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी लागलीच संशयित आरोपी राहुल पाडळे या तरुणास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील मंगल शेळके व राहुल पाडळे या दोघा तरुणांचा जुना वाद होता. या वादातून १६ रोजी रात्रीच्या वेळी दोघात फेकरी उड्डाण पुलाजवळ जोरदार वाद होत हाणामारी झाली. जुना वाद उकरुन राहुल पाडळे याने मंगल शेळके याची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ करत त्याचेसोबत झटापट केली. मंगल यास राहुलने मोटार सायकलवर जोरात ढकलून दिल्याने त्याच्या डॉक्याला गंभीर दुखापत झाली. 17 जून रोजी मयत मंगल शेळके याचा भाऊ आकाश शेळके याने दिलेल्या फिर्यादीनु सार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत राहुल पाडळे याला अटक करण्यात आली आहे. परिविक्षाधीन उप विभागीय अधिकारी सतिश कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.