
जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२२
शहरातील हरी ओम नगरातील परिसरातून अनोळखी चोरट्यांनी घराबाहेरुण गाय व वासरू चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुना कानळदा रोड परिसरातील हरी ओम नगरातील रहिवासी असलेले संजय दगडू अंभोरे यांच्या मालकीची ४० हजार रुपये किमतीची गाय व १५ हजार रुपये किमतीचे वासरू दि ४ डिसेंबर २०२२ रोजी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याने संजय अंभोरे यांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ना.योगेश पाटील हे करीत आहेत.




















