जळगाव मिरर | १० जुलै २०२३
राष्ट्रवादीत मोठे बंड झाल्यावर शरद पवारांचे एकनिष्ठ नेते अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी लागलीच राज्यातील जनतेसमोर येत माफी देखील मागायला सुरुवात केली आहे. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर टीका करत आहेत. आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावेळी अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटीलही आहेत. आता शरद पवारांची साथ का सोडली? याचे कारणही दिलीप वळसे पाटील जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी मोठा खुलासा करत थेट रोहित पवार यांचे नाव घेतले आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या अनुभवाएवढे त्यांचे वय नाही, रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. वळसे पाटील म्हणाले, रोहित पवारांचे वय 37 वर्षे आहे. मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवे.
आपण हा निर्णय घेतला असला तरी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. तसेच ते म्हणाले, आंबेगावमध्ये ऊस शेती आहे आणि ऊसाला पाणी मिळाले नाही तर शेतकरी आर्थिक अडचणीत येईल. मी आमदार राहील किंवा मंत्री राहील हे नक्की नाही. मात्र असे निर्णय झाले तर येथील परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. यासाठी निर्णय करून घेताना मोठी ताकत सोबत असावी लागते, असेही ते म्हणाले.
