
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन जणांचे कॅबिनेट असा नारा विरोधकांनी राज्यभर देत असताना अचानक शिंदे सरकारने तात्काळ मंत्री मंडळाचा विस्तार केला पण आतापर्यंत कोणतेही खाते वाटप झालेले नाही. दोन दिवसावर स्वांतत्र्यदिन आहे. यासाठी शासकीय ध्वजारोहण करणार कोण अशी चिन्हे असताना आज ११ रोजी सायकांळी जिल्ह्यानुसार मंत्र्याची नावे व जिल्हे जाहीर केले आहेत.
येत्या स्वांतत्र्यदिनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारी ध्वजारोहण कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरुन आता ही यादी म्हणजेच पालकमंत्रीपदांची यादी असल्याची चर्चा सुरु आहे. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी १९ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात, सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात, चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करतील. त्यामुळं जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ जिल्ह्यांव्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वाजारोहण करणार आहेत. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यांतील ध्वजारोहणाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे. याची यादी अशी…
१) नागपूर – देवेंद्र फडणवीस
२) पुणे – चंद्रकांत पाटील
३) चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
४) अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील
५) नाशिक – गिरीश महाजन
६) धुळे – दादा भुसे
७) जळगाव – गुलाबराव पाटील
८) ठाणे – रविंद्र चव्हाण
९) मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
१०) सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
११) रत्नागिरी – उदय सामंत
१२) परभणी- अतुल सावे
१३) औरंगाबाद – संदीपान भुमरे
१४) सांगली – सुरेश खाडे
१५) नंदुरबार – विजयकुमार गावित
१६) उस्मानाबाद – तानाजी सावंत
१७) सातारा – शंभुराज देसाई
१८) अब्दुल सत्तार – जालना
१९) यवतमाळ – संजय राठोड




















