जळगाव मिरर | १९ जुलै २०२५
पती-पत्नी कामावर गेलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १७जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मोहननगरमधील जितेंद्र राजेंद्र खर्चाने (३९, रा. मोहननगर) व त्यांच्या पत्नी विवेकानंद शाळेमध्ये नोकरीला आहे. १७ जुलै रोजी दोघेजण सकाळी १०:३० वाजता कामावर गेले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील मंगलपोत, सोन्याची चेन, सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याचा तुकडा, नाकातील नथ, पदक, कानातील झुमके, चांदीच्या तीन अंगठ्या, तीन चेन, करदोडा, साखळ्या व इतर दागिने असे एकूण एक लाख २९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
शाळेतून आई-वडिलांकडे गेलेले खर्चाने हे रात्री घरी आले त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरात चोरी झाल्याचे लक्षात आहे. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
