जळगाव मिरर । 1 नोव्हेंबर 2025
शहरातील कानळदा रोडवरील भाग्यश्री पेट्रोल पंपाच्याबाजूला असलेल्या सत्यम नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार प्रकाश पिसाळ रा. शाहू नगर, जळगाव यांचे नवीन घर कानळदा रोडवरील भाग्यश्री पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या सत्या नगरात आहे. तुषार पिसाळे आपल्या कुटुंबियासह सत्या नगर येथे वास्तव्याला आहेत. दिवाळी निमित्त पत्नी माहेरी गेल्यामुळे तुषार पिसाळ हे शाहू नगरातील राहत्या घरी राहत होते. दरम्यान बंद घर असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटाचे नुकसान केले.
तसेच कपाटातील सामान अस्तवस्त केला. घरात कोणतेही मौल्यवान दागिने व रोकड नसल्याने चोरट्यांना रिकामे हाती परतावे लागले. परंतू चोरट्यांनी घरातील सामानांचे नुकसान केले आहे. तुषार हे शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता झाडांना पाणी टाकण्यासाठी घरी गेले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे दिवून आले. या संदर्भात तुषार पिसाळ यांचे भाऊ मयूर पिसाळ यांनी शहर पोलीसात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.




















