जळगाव मिरर । २५ नोव्हेबर २०२२
एरंडोल शहरातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून तब्बल ३ लाख २४ हजाराच्या दागिन्यासह रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी एरडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल शहरातील कासोदा रोडवर असलेल्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये दि २३ रोजी मध्यरात्री कुळाच्या घराचे कुळ तोडून अनोळखी चोरट्यांनी शासकीय रेस्ट हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानात घुसत घरातील २ लाख ३४ हजाराची सोने व चांदीचे दागिने व ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आल्यानंतर प्रताप मदन बारेला यांनी एरंडोल पोलीस स्थानक गाठत घरफोडीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.