जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी चित्रा चौकात असलेल्या जिल्हा कृषी औद्योगीक सर्वसेवा सहकारी संसी मर्यादीत या कापड दुकानात प्रवेश केला. त्याठिकाणाहून आठ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चित्रा चौकात जिल्हा कृषी औद्योगी सर्वसेवा सहकारी संस्था मर्यादीतचे कापड दुकान आहे. याठिकाणी कमलाकर अभिमन ठाकरे (वय ६०, रा. घनश्याम नगर) हे नोकरीस आहे. दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी निघून गेले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ठाकरे हे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानावर आले असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर कमलाकर ठाकरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर हे करीत आहे