जळगाव मिरर | १६ जून २०२३
जिल्ह्यात अनेक दिवसापासून दुचाकीसह घरावर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांची धाव आता चारचाकीकडे गेली असून आता भुसावळ शहरातील छायादेवी राकानगर साकरी फाटा या भागातून घरासमोरून चोरट्याने कार लंपास केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छायादेवी राकानगर, साकरी फाटा येथील किशोर प्रभुदास निकम यांनी पंधरा दिवसांपूर्वी मित्र मकसूद शरीफ अहेमद शरीफ याच्याकडून मारुती इको (एमएच ४० केआर ७३६२) विकत घेतली. घराच्या संरक्षक भिंतीजवळ कार उभी केली होती. बुधवारी सकाळी झोपेतून उठून पाहिले असता कार कार घरासमोर नव्हती. त्यांनी कारचा इतर ठिकाणी तपास केला. कार कुठेच मिळून आली नाही. कार चोरीला गेल्याने त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.