जळगाव मिरर | २४ मार्च २०२५
कानसवाडा येथील माजी उपसरपंच खूनप्रकरणी तिसऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलिसांनी रविवारी अटक केली. आता या प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपी पोलिसांना सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य युवराज कोळी यांचा वडिलांसमोर खून करण्यात आला. या प्रकरणी परेश पाटील, भरत पाटील व देवेंद्र पाटील या बापलेकांविरुद्ध नशिराबाद पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी यातील परेश व देवेंद्र या दोघा भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर घटनेनंतर फरार भरत पाटील या संशयिताला पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.




















