जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२५
शहरातील सिंधी कॉलनी, गणेश नगर येथील कृष्णा आनंदा जोशी यांचा बग्गीचा व्यवसाय असुन त्यांच्या मालकीचा एक लाख रूपये किंमतीचा सिंधी जातीचा घोडा हा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला असतांना दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील आजुबाजुचे परीसरातील जवळपास ३५ सिसिटीव्ही तपासले असता तिन मुलं सदर घोडा चोरी करुन घेवुन जात असतांना दिसले. याची सखोल तपास करता ती मुले शिवाजी नगर व कोंबडी बाजार परीसरात राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर मुलांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी गुन्ह्याबाबत कबुली दिली असुन, त्यांच्या ताब्यातुन फिर्यादी यांचे मालकीचा चोरीस गेलेला घोडा हा ताब्यात घेण्यात आलेला आहे.