जळगाव मिरर । १९ नोव्हेबर २०२२
कुपवाडा येथील मच्छल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गस्तीवर असलेले भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गनर सौविक हाजरा, लान्स नाईक मुकेश कुमार, नाईक गायकवाड मनोज लक्ष्मण राव यांना शुक्रवारी हिमस्खलनात आपला जीव गमवावा लागला.
UPDATE | A snow slide struck a patrol party in Machhal Sector. 2 soldiers stuck in snow were rescued & evacuated to Military Hospital Kupwara. Another soldier part of patrol, developed hypothermia & was evacuated to Military hospital. All 3 couldn't survive: PRO Defense Srinagar
— ANI (@ANI) November 18, 2022
गस्तीवर असताना या सैनिकांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. बर्फात अडकलेल्या 2 सैनिकांची सुटका करून त्यांना कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तिघांचाही बचाव करण्यात अपयश आल्याचं संरक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.