जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरुन घेवून जात ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामुहीक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दि. २० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास खेडी रस्त्यावर घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक संशयित पसार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पीडित महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तीघ रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर सामुहीक अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत आहे.
