
जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२३
सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. अशातच या घटनेने ऐन गणेशोत्सवाला गाळबोट लागलं आहे. लोकांमध्ये गणपतीचे आगमन झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहाच्या भरात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुः खद घटना बुधवारी सांयकाळी घडली. त्यामुळे अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
दीड दिवसांच्या गणपतीचे काल विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० सप्टेंबर सायंकाळी वाडा तालुक्यात घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दीड दिवसाचे गणपतींचे विसर्जन करण्यास गेले असता जगत नारायण मौर्य( वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) हे कोनसाई येथे नाल्यात पडले. तर प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) यांचा गोऱ्हे येथील तलावात पडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांचे गणपती विसर्जन करण्यास गेले असता पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघे जण पडले तर गोऱ्हे येथील तलावात बूडून एकाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरातस दुः खाचे वातावरण पसरले आहे.






















