जळगाव मिरर | २ जुलै २०२५
खून, प्राणघातक हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६, रा. गणेशवाडी) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई करीत नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ३० जून रोजी दिले.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सचिन चौधरी याच्याविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे असे नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरी देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने जिल्हापेठ हापेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी त्याच्या एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर त्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण यांनी प्रस्तावाचे कामकाज पाहिले. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सपोनी संतोष चव्हाण, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, विकास पोहेकर यांनी नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
