
जळगाव मिरर | २३ मे २०२५
जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ‘टीप टीप बरसा पानी’ने नवीन बीजे मार्केटमधील बेसमेंटला पाणी तुंबून तलाव निर्माण झाला आहे. यामुळे या मार्केटमधील व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत वारंवार व्यापाऱ्यानी मनपाला निवेदन देवून देखील या परिसरात कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून तिसऱ्या मजल्यावरून ‘टीप टीप बरसा पानी’ने बेसमेटमध्ये असलेल्या व्यापाऱ्याच्या पार्किंग परिसरात खराब पाण्याचा तलाव निर्माण होत आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या उद्योगावर मोठा परिणाम होवून या परिसरात ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांचा आर्थिक उद्योग देखील मंदावलेला आहे. याबाबत या मार्केट मधील काही व्यापाऱ्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन, तक्रारी करून देखील कुठलीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून आले आहे. यावर मनपाने तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील व्यापाऱ्यानी दिला आहे.



















