जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२२
मेष : अभ्यास वेळच्या वेळी करा. कामांमध्ये असणारे अडथळे दूर होतील. कुटुंबीयांना वेळ द्या.
वृषभ : आज मन शांत असेल कामाचा व्याप कमी असेल. संध्याकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळेल.
मिथुन : देवाणघेवाणीत फार विचार करु नका. विनाकारण कोणत्याही वादात अडकू नका. जुन्या मित्रांची भेट घडेल.
कर्क : नोकरीच्या क्षेत्रात अडचणी उदभवतील. वरिष्ठांशी वाद घालू नका. इतरांचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
सिंह : आपल्या माणसांना नाराज करु नका. दिवस धावपळीचा असेल. पण, ही धावपळ आज सार्थकी लागणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे.
कन्या : विद्यार्थीदशेत असाल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. व्यवसायाशी संबंधित एखादा महत्त्वाचा आणि फायद्याचा निर्णय घ्याल.
तुला : गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज कुटुंबात लग्नाची वार्ता कळणार आहे. आपल्या माणसांचा सहवास मिळेल.
वृश्चिक : घरी पाहुणे येणार आहेत. विवाहोत्सुकांसाठी मनाजोगं स्थळ येणार आहे. आज तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडणार आहे.
धनु : आज वेगानं कामं पूर्ण होणार आहेत. दुपारपर्यंत महत्वाची कामं पूर्ण करा. आज तुळशीची पूजा करा.
मकर : कोणाशीही खोटं बोलू नका. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. कोणाशी तोडून बोलू नका.
कुंभ : कुटुंबीयांच्या मतांना प्राधान्य द्या. आज शुभवार्तच कळेल. नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे. अडकलेली कामं मार्गी लावाल.
मीन : कुटुंबात आनंदाचा माहोल असेल. एखादी शुभवार्ता संपूर्ण वातावरण बदलणार आहे. आजचा दिवस कायम लक्षात राहणार आहे.



















