
जळगाव मिरर । १० नोव्हेबर २०२२
चाळीसगाव शहरातील एका २५ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळीनी बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी सात जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील माहेर असलेली विवाहिता सारिका युक्रात बोरसे(वय २५) हिचे सासर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील आहे, तिला ऑगस्ट २०२१ पासून ते आजपर्यंत बुलेट मोटार सायकल घेण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी सासरचे मंडळी शारीरिक, मानसिक त्रास देवून छळ करीत असल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पती युक्रात दिलीप बोरसे, सासू भारतीबाई दिलीप बोरसे, सासरे दिलीप यशवंत बोरसे, रा.शिरपूर, नणंद सुनैना गजानन ब्राम्हणे, गजानन ब्राम्हणे, रा.नंदुरबार, गीताजली भामरे, रविद्र भामरे, रा.धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.किशोर सोनवणे हे करीत आहे.




















