जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४
चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मजरे हिंगोणे गावाजवळील शेतात बेवारस चारचाकी वाहनातून गांजाची वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये २ लाख ७७ हजारांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला असून संशयित मात्र फरार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावातील वन विभागाचा चेकनाका तोडून (एम.एच.१२ एफ.एफ. १९८) क्रमांकाची कार मंगळवारी दुपारी चोपड्याकडे येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अशोक विजय यादव यांनी ग्रामीण पोलीसांना दिली. त्यानुसार सपोनी शेषराव नितनवरे हे घटनस्थळी दाखल झाले. संशयिताने मजरे हिंगोणे येथील शेतात आपले चारचाकी वाहन उतरवून तो पसार झाला. त्यांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडून गांजाची सुमारे १२ किलोची सहा पाकीटे जप्त करण्यात आली. तसेच फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
