जळगाव मिरर / ३० ऑक्टोबर २०२२
गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल बंद होता. याच महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी तो वाहतूकीसाठी खूला करण्यात आला होता. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिला प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन नंबर (02822243300) जाहीर करण्यात आलेला आहे. पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांची आहे, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या पूलावर सुमारे 500 लोकांची गर्दी जमली होती. हेच अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातमध्ये मोरबी येथे रविवारी सांयकाळी ७ वाजता एक मोठी दुर्घटना घडली. येथील केबल ब्रिज (झुलता पूल) तुटल्याने सुमारे ४०० लोक मच्छू नदीत कोसळले आहेत. या अपघातात आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये 10 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. तर सर्व मृतकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर सुमारे ७० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटींच्या निधीतून या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले करण्यात आले दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून बचाव कार्याची माहिती घेतली. सीएम पटेल म्हणाले- मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.
दरम्यान, अपघातावरून काँग्रेसने भाजप सरकारला घेरले आहे. निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटना दुःख देणारी असल्याचे म्हटले आहे.
हा पूल १४० वर्षांहून अधिक जुना आहे
२० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. १८८० मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात असे.
शेकडो स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले
या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्या मदतकार्य सुरू आहे. बचाव पथकासोबतच शेकडो स्थानिक लोकही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. नदीत उतरून लोकांना बाहेर काढले जात आहे.
या पुलाहुन राजा करीत होता ये – जा
या पुलावरून राजा प्रजावत्सल्य राजवाड्यातून राजदरबारात जात असत. मोरबीचा राजा प्रजावत्सल्य वाघजी ठाकोर यांच्या संस्थानकाळात हा पूल बांधण्यात आलेला होता. त्यावेळी राजवाड्यातून राजदरबारात जाण्यासाठी राजा या पुलाचा वापर करत असत. राजेशाही संपल्यानंतर या पुलाची जबाबदारी मोरबी नगरपालिकेकडे सोपवण्यात आली. लाकूड आणि तारांनी बनलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे.