
जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२५
धरणगाव तालुक्यातील सोनवद जवळील अहिरे बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी व विकासोसायटी चेअरमन शरद पंढरीनाथ पाटील (वय ५५) यांचे दि.५ सप्टेंबर रोजी रात्री ७.५० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात, आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होय. त्यांची अंत्ययात्रा दि.६ रोजी सकाळी १० वाजता अहिरे बुद्रुक येथील राहत्या घरून निघणार आहे. ते पत्रकार विजय शरद पाटील यांचे वडील होत.




















