
जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक महामार्गावर बसच्या अपघाताची घटना नियमित घडत असताना आज रविवारी देखील कसारा घाटात एक विचित्र अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. नाशिक – मुंबई लेनवरील कसारा घाटात बससह अन्य ३ गाड्यांचा हा अपघात झाला आहे. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचं सांगण्यात यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कसारा घाटात रविवारी सायंकाळी एक कारला ट्रकने धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी या अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. जखमींना सुक्षित ठिकाणी पोहोचवलं असता यावेळी एका भरधाव बसने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कारसह बसचे मोठे नुकसान झाले आहे. या विचित्र अपघानंतर तिथे भीतीचं वातावरण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काही मिनिटातच आपत्ती व्यवस्थापन् टीम आणि पोलीस पोहोचले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, यात नेमकी चूक कोणाची होती? याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.