
जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
शहरातील ईच्छादेवी चौकात काल संध्याकाळी अविनाश सुभाष अंधारे (वय २६) या तरुणावर दोघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. जखमी तरुणाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत प्राणघातक हल्याचा गुन्हा दाखल करण्यात येवुन पोलिसांनी अठरा तसांतच पळून जाणाऱ्या दोघ संशयीतांना पाठलाग करुन अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा ईच्छादेवी मंदीराच्या मागील बाजुस अविनाश सुभाष अंधारे (वय-२६) हा तरुण कुटूंबीयांसह वास्तव्यास असून तो, बुधवारी संध्याकाळी घराबाहेर निघाला. ईच्छादेवी चौकात उभा असतांना त्याच्यावर दोन तरुणांनी धारदा चॉपरने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अविनाश अंधारे याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तो, शुद्धीत आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवुन घेतल्यावर लखन कमलेश परदेशी, स्वप्नील बापु कापसे अशा दोघांनी शस्त्राने हल्ला चढवला, या हल्ल्यात अविनाशच्या पोटात तीन ते चार वर्मी वार लागले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. हल्लेखोर दोघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांनी संशयीताच्या अटकेसाठी गुन्हशोध पथकास रवाना केले. उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, राकेश बच्छाव, किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर अशांच्या पथकाने सम्राट कॉलनी परिसरात संशयीत दडून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथकाने लखन कमलेश परदेशी, स्वप्नील बापु कापसे अशा दोघांना पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना अटक केली आहे.




















