जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे गेल्या दोन दिवसापूर्वी भरदिवसा व्यापाऱ्याला भरदिवसा लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २ संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली असून आणखी ४ फरार संशयितांचा शोध सुरू आहे. यात ४ वाहने जप्त करण्यात आले असून ४८ लाख जमा करण्यात आली आहे, याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील हे उपस्थित होते. महेश्वर रेड्डी पुढे म्हणाले की, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे व्यापाराचे १ कोटी ६० लाख रुपये लुटण्यात आले होते. या घटनेमध्ये संबंधित संशयित आरोपींनी कार चोरल्या. त्यानंतर चोपडा येथे घरफोडी करून त्यांनी धरणगाव येथे जबरी लूट केली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (वय ३२) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय २९) या दोन्ही जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून आणखी चार संशयित आरोपींना अटक करण्याच्या हालचाली सुरू झालेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
यांनी बजावली कामगिरी
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किसन नजनपाटील, ,एपीआय अमोल मोरे, पीएसआय गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बेसाणे, दर्शण ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, सफौ रवि नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, अनिल देशमुख सर्व नेमणुक स्थनिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.